गेल्या अनेक वर्षांपासून टाटा हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, मुंबई येथे विविध जिल्ह्यातील तसेच राज्याबाहेरील गरीब रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मुंबई मध्ये उपचारासाठी आल्यानंतर राहणे तसेच खाणे परवडत नाही अशा गरजू लोकांसाठी दररोज अन्नदानाचा उपक्रम राबविणाऱ्या "अन्नदाता सुखी भव:" या संस्थेच्या माध्यमातून शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत वेळोवेळी अन्नदान करण्यात येते. जय शिवराय