शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत ठाणे जिल्ह्यातील येऊर तसेच विविध आदिवासी पाडयांवर ट्रस्टच्या अनेक हितचिंतकांचे जन्मदिन, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर आनंदाचे क्षण साजरे केले जातात. यावेळी तेथील लहान मुलांसोबत वाढदिवस साजरे केले जातात, तसेच लहान मुलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. तसेच अनेकवेळा अन्नदान उपक्रम देखील राबविण्यात येतो.