तपशील

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय ट्रस्ट आयोजित श्री शिवराजाभिषेक सोहळा २०२२ (तिथीप्रमाणे) दर्शन व सहभाग

आई भवानी जगदंबेच्या कृपेने किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले जिजाऊ पुत्र शहाजीसुत श्री शिवाजीराजे छत्रपती झाले तो सोनियाचा दिनु ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ हिंदवी स्वराज्य स्थापना दिन आजही श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव समिती मार्फत किल्ले श्री रायगडावर शिवराजाभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्यामध्ये दरवर्षी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी छत्रपती श्री संभाजीमहाराजांची जयंती साजरी करण्यात येते तसेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराजाभिषेक सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये पालखी सोहळा तसेच श्री गडदेवता शिरकाई पूजन, श्री गणेश पुजन, श्री जगदीश्वर पूजन, श्री शिवतुलादान विधी, पारंपारिक गोंधळ आदि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय ट्रस्ट मार्फत श्री शिवराजाभिषेक सोहळा दर्शन व सहभाग याचे आयोजन करण्यात येते.