तपशील

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) आयोजित रायगडवारी ३१ डिसेंबर - १ जानेवारी मध्ये सहभाग

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) आयोजित रायगडवारी ३१ डिसेंबर मध्ये सहभाग:- राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) आणि शिवसंत श्री. कृष्णजी निवृत्ती पाटील, छत्रपती श्री शिवराय अभियान, केखले, वारणा, कोल्हापुर (छत्रपती शिवरायांच्या समाधीचे पुजारी, श्री क्षेत्र किल्ले रायगड) यांच्या मार्फत दरवर्षी ३१ डिसेंबर व १ जानेवारी या दिवशी रायगडवारीचे आयोजन करण्यात येते. यावेळी सर्व शिवभक्तांसोबत नवीन वर्षाच्या पहाटे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. तसेच छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचे पुजन केले जाते यावेळी सर्व माता-भगिनी, तरुण तसेच लहान मुले-मुली आणि वयस्कर शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. तसेच पाचाड येथील आई जिजाऊ समाधीची देखील मनोभावे पुजा केली जाते व महिलांचे ओटीभरण केले जाते. त्याचप्रमाणे छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधी दर्शनासाठी शिवभक्तांना नेले जाते तसेच शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत जास्तीत जास्त शिवभक्तांना यासाठी प्रोस्ताहीत केले जाते.