तपशील

शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षण

छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या आशिर्वादाने शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि इतिहासाचे अबोल साक्षीदार बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ॲफॅक इंग्लिश स्कूल, चेंबूर, मुंबई यांच्या सहकार्याने ॲफॅक इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षण चालू करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी चेंबूर येथील स्थानिक आमदार श्री. प्रकाशजी फातर्पेकर, ॲफॅक ट्रस्टचे सरचिटणीस श्री. जितेंद्र मंडलेचा सर, युद्धकला प्रशिक्षक वस्ताद श्री. लक्ष्मण साबणे, शस्त्र विशारद श्री. निलेश सकट, इतिहास शिक्षिका सौ. गंगा रमेश मॅडम, आचार्य श्री. रविंद्र मांजरेकर सर व शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शस्त्रविशारद श्री. निलेश सकट यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना शिवकालीन दुर्मिळ अशी ऐतिहासिक शस्त्रास्त्रे दाखवून त्याची माहिती दिली. त्यानंतर प्रशिक्षक वस्ताद श्री. लक्ष्मण साबणे यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, ढाल-तलवार यांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी चालविण्याच्या प्रशिक्षणास सुरुवात केली. || जय शिवराय ||