शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत ठाणे येथे शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षण सुरु करण्यात आले. ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी श्री. राजा ठाकुर साहेब आणि वकिल सौ. पुजा ठाकुर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सध्या युवा पिढीचे टेलिव्हिजन, संगणक, मोबाईल यासारख्या आधुनिक उपकरणांमुळे व्यायाम, वाचन, मैदानी खेळ याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी युवा पिढीला या विळख्यातून बाहेर काढून त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी तसेच आपल्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा जतन व्हावा या उद्देशातून शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम व राष्ट्राभिमानी पिढी तयार करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. राजा ठाकुर, अॅड. सौ. पुजा राजा ठाकुर मॅडम, सेंट्रल मैदान, ठाणे येथे गेले ५५ वर्षांपासुन क्रिकेटचे प्रशिक्षण देत असलेले ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. शशिकांत नाईक सर, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधाकर बक्षी साहेब, मर्दानी खेळ ज्येष्ठ प्रशिक्षक वस्ताद श्री.लक्ष्मण साबणे, शिव सह्याद्री मर्दानी आखाडा, ठाणेचे संस्थापक वस्ताद श्री. संदीप चव्हाण, ठाणे येथील ज्येष्ठ वकिल श्री. सुरेश साटम साहेब, मावळी मंडळ शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. आंग्रे साहेब, श्री. जयंत कदम साहेब, साप्ता. ठाणे नवादूतचे संपादक श्री. दिनेश जोशी साहेब, शस्त्रास्त्र विशारद श्री. निलेश अरुण सकट, मोडी लिपी अभ्यासक श्री. नितीन चव्हाण, वीर मराठा फाउंडेशनचे शिवभक्त श्री. पराग मुंबरकर, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर श्री. नंदकिशोर शिंदे, कबड्डीपट्टू सारा शिंदे, शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त, सर्व शिवभक्त आणि प्रशिक्षक उपस्थित होते. तरी छत्रपती श्री शिवरायांच्या आणि धर्मवीर श्री शंभूमहाराजांच्या स्वराज्यातील आपल्या माता-भगिनींना संकट समयी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तसेच आपली तरुण मुले-मुली व महिला-पुरुष यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्व:संरक्षणासाठी सज्ज होण्याकरिता जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रक्षिशणासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे.