“शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट” ह्या ट्रस्टची स्थापना समाजातील गरीब, गरजू, अपंग नागरिक तसेच ऐतिहासिक, आरोग्य, कृषी, सांस्कृतिक ई. क्षेत्रांशी निगडीत सामजिक स्वरूपाची कामे करण्यासाठी करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्षे “जय शिवराय शिवसामुग्री केंद्रा” मार्फत समाजकार्य सुरू होतेच, तरी आता नोंदणीकृत ट्रस्टच्या माध्यामातून माणुसकीची चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी श्री शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने ह्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. तरी आपण देखील ह्या चळवळीमध्ये आमच्या पाठीशी उभे राहून, या समाजकार्यात आर्थिक व वैयक्तिकरित्या सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार....!! तरी आपण जास्तीत जास्त नागरिकांना ह्या माणुसकीच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ट्रस्टला सहकार्य करावे, ही कळकळीची विनंती...!! या आपणही या शिवकार्यात सामील व्हा....!! || जय शिवराय ||