शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत पहिले मदत कार्य संपन्न झाले. खोणी, ता. कल्याण येथील घरकुल (अमेय पालक संघटना) या विशेष (मतिमंद) मुलांच्या संस्थेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. तेथील मुलांसाठी खाऊ तसेच रोजच्या जेवणासाठी आवश्यक तेल, तांदूळ, चहा पावडर, तेल इत्यादी जिन्नस पुरवण्यात आले. तसे घरकुल संघटनेला आणि तेथे दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन्मानार्थ छत्रपती श्री. शिवाजी महाराजांची प्रेरणादायी प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.