शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत जंगलपाडा, ता. जव्हार, जि. पालघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती निमीत्त शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व शिवरायांची आरती करण्यात आली आणि तेथील मुलांना एकेरी, चाररेघी, चौकोनी तसेच लॉंगबुक वह्या, विविध प्रकारची एक्टिविटी बुक्स, विविध प्रकारचे चार्ट्स, पट्टी, पेन्सिल ई. शैक्षणिक साहित्य आणि संगणकाचा एक संपूर्ण संच तसेच शाळेच्या वाचनालयासाठी विविध प्रकारची पुस्तके मदत म्हणून देण्यात आली. मुलांना शिवजयंती निमित्त भगवे झेंडे आणि खाऊचे वाटप देखील करण्यात आले. तसेच ई-साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुनील सामंत आणि टीम यांच्यातर्फे शाळेसाठी ऐतिहासिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, गोष्टी, कविता, कथा इत्यादी १२०० ऑनलाईन पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दैनिक महाराष्ट्र सम्राट च्या शिवजयंती विशेषांकाच्या प्रती शिक्षकांना देण्यात आल्या. यावेळी शाळेतील मुलांनी हस्तकलेच्या माध्यमातून विविध वस्तु बनवून दाखविल्या तसेच विविध कविता सादर केल्या. ट्रस्टच्या या उपक्रमामध्ये तेथील शिक्षक श्री. देवराम पालवी आणि श्री. मधुसूदन सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्यांनी शिवसंस्कृती ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आणि ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. || जय शिवराय ||