तपशील

सन्मान रणरागिनींचा...!! जागतिक महिला दिन – मार्च २०२२

८ मार्च जागतिक महिला दिन शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत जागतिक महिला दिन निमित्त रेल्वे आरक्षण केंद्र प्रमुख, ठाणे, महिला रेल्वे टी.सी., ठाणे लोहमार्ग महिला पोलिस, रेल्वे सुरक्षा बल महिला पोलिस, ठाणे शहर पोलिस प्रशिक्षक, परिवहन विभाग महिला वाहक, तसेच महिला रिक्षाचालक असलेल्या आपल्या माता-भगिनींचा छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा, लेडीज बॅग आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, प्रवासी वाहतुकीची, सुरक्षेची तसेच जनसमान्यांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी, समोर उभ्या असलेल्या अनेक समस्यांना तोंड देत या आपल्या माता-भगिनींना पार पाडावी लागते. त्याप्रमाणेच रिक्षा चालकाचा व्यवसाय हा देखील अत्यंत धाडसी आणि परिश्रमाचा आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, महिला रिक्षा चालकांना कर्तव्य व कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ साधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. सण, उत्सवांमध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती असते. कौटुंबिक आनंदापेक्षा कायद्याची जबाबदारी आणि कर्तव्याला त्या प्राधान्य देतात. अनेकदा मुलाबाळांकडे लक्ष द्यायलाही त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. तरी शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त आणि पदाधिकारी सौ. स्वाती कल्याणी यांच्यातर्फे नारी शक्तीचा महिला दिना निमित्त छोटासा सन्मान करून त्यांच्या या कार्याला सलाम करण्यात आला. "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जिवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; तमाम स्त्री शक्तिला जागतिक महिला दिनाच्या हर्दिक शुभेच्छा.....!! || जय शिवराय ||