तपशील

रक्तदान शिबीर – मार्च २०२२

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि दैनिक महाराष्ट्र सम्राट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमीत्त (तिथीनुसार) जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, कोर्ट नाका, ठाणे (प) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उदघाटन ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक श्री. चंद्रकांतजी भोईटे आणि आदर्श संस्कार केंद्राचे संस्थापक आणि माजी नगरसेवक श्री सुधाकरजी बक्षी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरासाठी ब्लडलाईन चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे आणि मेट्रोपॉलिस लॅब विशेष सहकार्य लाभले. यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री. गणेश भोईटे, शस्त्रास्त्र विशारद श्री. निलेश सकट, मोडी लिपी अभ्यासक श्री. नितीनराज चव्हाण, अन्नदाता सुखी भव: या उपक्रमाचे संस्थापक श्री. जय होलमुखे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी शिवसंकृती ट्रस्टचे विश्वस्त श्री. शशिकांत रणवरे, श्री. मयुर रणवरे आणि इतरांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तदान शिबीरात सहभाग घेतलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे ट्रस्टच्यावतीने आभार व्यक्त करून, या पुढे अजून जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचा ट्रस्टचा मानस राहील असे शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे आणि विनय गावडे यांनी सांगितले.