तपशील

रेल्वेचा १६९ वा वर्धापनदिन – एप्रिल २०२२

ठाणे रेल्वे प्रवासी संघटना यांच्या वतीने दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी रेल्वेचा १६९ वा वर्धापनदिन माननीय आमदार श्री. संजय केळकर आणि श्री. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पार पाडला. या वेळी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, सचिव सुधाकर पतंगराव, शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्टचे विश्वस्त तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून रेल्वेचा वर्धापन दिन साजर करण्यात आला. तसेच मान्यवरांचा छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवासी उपस्थित होते. || जय शिवराय ||