शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत कशेळी आदिवासी पाड्यातील मुला-मुलींसाठी शैक्षणिक वस्तू, खाऊ, खेळणी, कपडे आणि महिलांसाठी कपडे, सॅनिटरी पॅड व दैनंदीन वस्तूंची मदत देण्यात आली. श्री. छोटू मुनकर, सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राहुल अर्बन पतसंस्थेचे ठाणे शाखा व्यवस्थापक श्री गणेश चौधरी यांचा जन्मदिन त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ट्रस्टच्या या उपक्रमासाठी त्यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये ट्रस्टचे सन्माननीय देणगीदार व हितचिंतक श्री सचिन फर्डे, श्री रुपेश सपकाळे, श्री सिद्धेश भिंगारे, श्री निलेश कोळेकर, श्री अमोल औटी, वकील श्री सुरेश साटम, श्री अजित नवरत, श्री. देवानंद ईशी, सौ प्रमिला ईशी, वकील शलाका साटम, श्री महेश चोरगे, श्री. गौतम परिहार, श्री. अजय जयस्वाल यांनी सहभाग घेतला. यावेळी छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना शैक्षणिक साहित्य वह्या-पुस्तके खेळणी आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले, तसेच आदिवासी पाड्यातील महिलांना दैनंदिन वापराच्या वस्तू आणि शिधा मदत म्हणून देण्यात आली.