जिल्हा परिषद शाळा, कशेळी येथील विद्यार्थ्यांना लहान व मोठ्या वह्या, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, चित्रकलेच्या वह्या वस्तूंची मदत देण्यात आली. शिक्षिका समिधा झेंडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राहुल अर्बन पतसंस्थेचे ठाणे शाखा व्यवस्थापक श्री गणेश चौधरी यांचा जन्मदिन त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ट्रस्टच्या या शैक्षणिक उपक्रमासाठी त्यांचे विशेष सहकार्य लाभले. या शैक्षणिक उपक्रमामध्ये ट्रस्टचे सन्माननीय देणगीदार व हितचिंतक श्री सचिन फर्डे, श्री रुपेश सपकाळे, श्री सिद्धेश भिंगारे, श्री निलेश कोळेकर, श्री अमोल औटी, वकील श्री सुरेश साटम, श्री अजित नवरत, श्री. देवानंद ईशी, सौ प्रमिला ईशी, वकील शलाका साटम, श्री महेश चोरगे, श्री. गौतम परिहार, श्री. अजय जयस्वाल यांनी सहभाग घेतला. यावेळी छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना शैक्षणिक साहित्य वह्या-पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.