तपशील

जिल्हा परिषद शाळा कुंभारखांड, ता. जव्हार, जि. पालघर येथील शैक्षणिक मदत - जुन २०२२

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत जिल्हा परिषद शाळा कुंभारखांड, ता. जव्हार, जि. पालघर या शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी तेथील मुलांना एकेरी, चाररेघी, चौकोनी वह्या, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाट्या तसेच पाटीवरील पेन्सिल ई. वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व शिवरायांची आरती करण्यात आली, तसेच मुलांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक श्री. विष्णु पिलाना सर तसेच तेथील गावकर्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी त्यांनी शिवसंस्कृती ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आणि ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. || जय शिवराय ||