शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत भिवंडी भगिनी मंडळाचे मातृछाया मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील निराधार व गरजु मुलींना दिपावली निमीत्त दिवाळी फराळ, नवीन कपडे, किराणा सामान, शैक्षणिक साहित्य, सॅनिटरी पॅड इत्यादी वस्तू पुरविण्यात आले. छत्रपती श्री शिवरायांची आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर उपक्रमामध्ये वकिल उपासना पांडे आणि सुनिल लहाने यांनी दिवाळी सणानिमीत्त येथील निराधार मुलींकरिता नवीन कपडे उपलब्ध करून दिले. तसेच यावेळी ट्रस्टच्या उपक्रमात नेहमी कार्यरत असणारे श्री. आबा काळसेकर यांचा ६६वा जन्मदिन या मुलींसोबत साजरा करण्यात आला व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भगिनी मंडळाच्या श्रीमती जयश्री शेलार तसेच सर्व मुलींनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले. यावेळी मुलींनी स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच या मुली सर्व कठीण परिस्थितीला तोंड देऊन भगिनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली कसे यश प्राप्त करीत आहेत याबाबत माहिती दिली आणि सोबतच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या तसेच ज्यांना येणे शक्य नाही तरी भरभरुन मदत दिलेल्या सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे आभार मानले. शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमास आपण करीत असलेल्या सहकार्याबद्दल आपले खुप खुप आभार......!! || जय शिवराय ||