तपशील

वर्धापन दिनानिमित्त स्नेहभेट कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन - नोव्हेंबर २०२२

शिवसंस्कृती समाजिक व बहुउद्देशीय ट्रस्टच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मो.ह. विद्यालय, ठाणे येथे स्नेहभेट कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख तसेच मराठा उद्योजक लॉबीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुरंदरच्या तहावेळी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेले नरवीर मुरारबाजी देशपांडे काका यांचे वंशज श्री. नक्षत्र देशपांडे, शस्त्रास्त्र संग्राहक श्री. निलेश सकट आणि मोडिलिपी अभ्यासक श्री. नितीनराज चव्हाण हे उपस्थित होते. ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रस्टच्या उपक्रमासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ट्रस्टमार्फत वर्षभरात राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक अशा विविध उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरद्वारे प्रक्षेपित करण्यात आली. या कार्यक्रमावेळी श्री. दिनेश सिंग, श्री. गणेश भोईटे, श्री. बाबासाहेब खंडागळे, श्री. संदीप पालवी, श्री किरण अन्वेकर, श्री. महेश तारमाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मराठा उद्योजक लॉबी चे सदस्य श्री. मुकेश मराठे, श्री.ओमकार मोरे, श्री. महेश चव्हाण, श्री. शैलेश चव्हाण, श्री. गणेश खैरे, श्री. प्रसाद घाटकर, श्री. सुनील जाधव, श्री. मिलींद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व हितचिंतकांनी शिवसंस्कृती ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरास महात्मा गांधी ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. || जय शिवराय ||