तपशील

मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर शिवजयंती (तारखेप्रमाणे) निमीत्त भिवंडी भगिनी मंडळाचे मातृछाया मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे - फेब्रुवारी २०२३

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती २०२३ (तारखेप्रमाणे) निमीत्त भिवंडी भगिनी मंडळाचे मातृछाया मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील विविध तालुक्यांमधून शिक्षणासाठी आणि आसऱ्यासाठी आलेल्या निराधार मुलींकरीता मदत उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) चे संस्थापक अध्यक्ष शिवसंत श्री. विजयदादा खिलारे, शिवसंत सौ. नुतनआई खिलारे, वस्ताद श्री. अमित गडंकुश, वस्ताद सौ. अमृता गडांकुश, अॅड. सौ. चारुलता दळवी, अॅड. श्री. संतोष दळवी, श्री. विजय कदम, दिपाली गायकर मॅडम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले आणि छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. तसेच सर्व मान्यवरांचा छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा आणि मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला. छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच (छावा प्रतिष्ठान), नवी मुंबईचे संस्थापक वस्ताद श्री. अमित गडांकुश यांनी मुलींना मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला यांचे प्रशिक्षण दिले. तसेच संकटसमयी स्व:ताचे संरक्षण आणि बचाव कसा करवा याची विविध प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लाठी-काठी चालविणे तसेच इतर युद्वकलेची प्रत्याक्षिके स्वतः करून अनुभवली. त्यानंतर राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) मार्फत "राजा श्रीशिवछत्रपती...गाथा शौर्याची" या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले आणि मुलींना शिवरायांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात कसे अंगिकारले पाहिजेत याबद्दल शिवरत्न श्री. योगेश खिलारे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अॅड. सौ. चारुलता दळवी यांनी मुलींना त्यांच्या जीवनातील या खडतर प्रवसामध्ये आपला विकास कसा साधावा, आपले भविष्य कसे उज्वल करावे, आपल्या पुढील वाटचालीमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे याबद्दल विशेष असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे विश्वस्त श्री. मयुर रणवरे यांनी केले. या उपक्रमामध्ये येथील निराधार व गरजू मुलींसाठी सॅनिटरी पॅड, विविध प्रकारची कडधान्ये, खाऊ व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली, तसेच वसतीगृहासाठी विविध प्रकारची भांडी आणि इतर साहित्य पुरविण्यात आले. यावेळी मुलींसाठी अन्नदान देखील करण्यात आले. या उपक्रमासाठी वसतीगृहाच्या व्यवस्थापक श्रीमती जयश्री शेलार मॅडम तसेच भगिनी मंडळाच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम राबविण्यासाठी श्री. विजय कदम नवी मुंबई, श्री. संकेत जाधव ठाणे आणि ट्रस्टचे सर्व देणगीदार व हितचिंतकांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमावेळी ट्रस्टचे विश्वस्त तसेच सौ. गितांजली रणवरे, सौ. समृद्धी खिलारे, श्री. महेश कल्याणी, सौ. स्वाती कल्याणी, श्री. मंगेश पवार, श्री. विकास वाघ, श्री. अमित जाधव, श्री. संतोष भाबड, श्री. सुयोग ढेंबरे, श्री. चेतन नामे इत्यादी उपस्थित होते. || जय शिवराय ||