शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत गुढीपाडवा नववर्षानिमित्त मो. ह. विद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उदघाटन राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसंत श्री. विजयदादा खिलारे, शिवसंत सौ. नुतनआई खिलारे आणि मराठा उद्योजक लॉबीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. विपुल दादा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती श्री शिवराय आणि प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांची आरती करण्यात आली. छत्रपती श्री शिवराय आणि सर्व मावळ्यांनी स्वराज्याच्या रक्षणार्थ आपले रक्त सांडले होते तरी प्रत्येक नागरिकाने रक्तदान करतेवेळी हा विचार केला पाहिजे. आपण निदान आपल्या या स्वराज्यातील प्रत्येक गरजू नागरिकाचा जीव वाचावा यासाठी का रक्त दान करू नये? हा प्रश्न जेव्हा जनतेच्या मनात निर्माण होईल तेव्हा कोणताच तरुण रक्त दान केल्या शिवाय राहणार नाही, असे मनोगत शिवसंत विजयदादा खिलारे यांनी व्यक्त केले. या रक्तदान शिबिरासाठी महात्मा गांधी ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबीरामध्ये शस्त्रास्त्र विशारद श्री. निलेश सकट, मोडी लिपी अभ्यासक श्री. नितीनराज चव्हाण, अॅड. श्री. सुधीर जगदाळे, अॅड. किरण शिंदे, अॅड. राजु म्हात्रे, मराठा उद्योजक लॉबीचे श्री. मुकेश मराठे व इतर मान्यवर हजर होते. यावेळी उपस्थितांना छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा व मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मराठा उद्योजक लॉबीचे सदस्य श्री. बापुराव भोसले, श्री. ओमकार मोरे, श्री. शैलेश चव्हाण, श्री. प्रसाद घाटकर, श्री. सुनील जाधव, श्री. नरेश खापरे व श्री. विशाल ढेकले व इतरांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व हितचिंतकांनी शिवसंस्कृती ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.