तपशील

७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मु.पो. तळेखल, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील विद्यार्थ्यांसाठी संगणक, १२०० ऑनलाईन पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. - ऑगस्ट २०२३

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय ट्रस्ट मार्फत ७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मु.पो. तळेखल, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी संगणक, एकेरी वह्या, लाँग बुक तसेच शाळेसाठी ई-साहित्य प्रतिष्ठान प्रकाशित शैक्षणिक, कथा, ऐतिहासिक, थोर समाजसुधारक ई. विषयांची १२०० ऑनलाईन पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली आणि छत्रपती श्री शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती देऊन शिवचरित्राच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक तसेच पुढील जीवनामध्ये कशी प्रगती साधण्यात यावी याबद्दल मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तसेच शाळेसाठी छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा अर्पण करण्यात आली. या शाळेमधील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यासाठी ट्रस्टला केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शाळा प्रशासनाकडून शिवसंस्कृती ट्रस्टच्या सर्व देणगीदारांचे व हितचिंतकांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमासाठी शिक्षिका सौ.विद्या शिर्के व इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.