शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि इतिहासाचे अबोल साक्षीदार ट्रस्ट मार्फत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर. या शिबीरामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, भाला, फरीगदका, ढाल-तलवार, फरशी कुऱ्हाड चालविणे अशा विविध शिवकालीन युद्धकलांची माहिती देण्यात येते तसेच प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात. आजच्या युगात आपली लोप पावत चाललेली संस्कृती तसेच शिवकालीन मर्दानी युद्धकला जपण्यासाठी आणि यातून एक सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी ट्रस्ट मार्फत शाळा प्रशासनाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रशिक्षक वस्ताद श्री. लक्ष्मण साबणे, श्री. मंगेश केणी आणि शस्त्रविशारद श्री. निलेश सकट यांच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.