तपशील

शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत मुला मुलींचे समर्थ विद्यालय, कलिना, मुंबई या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले - ऑक्टोबर २०२३

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत मुला मुलींचे समर्थ विद्यालय, कलिना, मुंबई या शाळेतील गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या, ज्यांचे पालक रोजंदारीवर काम करीत आहेत अशा शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेल्या विद्यार्थ्यांना लॉंग नोटबुक, दुरेघी वह्या, चाररेघी वह्या, प्रयोगशाळा वह्या, प्रोजेक्ट पेपर, फुलस्केप पेपर, पेन, खडू कलर, वॉटर कलर व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत ट्रस्टमार्फत अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली की ज्यांना सद्यस्थितीत सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाकरिता आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा वह्या व इतर शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध नाही. कार्यक्रमच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ॲफॅक इंग्लिश स्कूल, चेंबूर, मुंबईच्या उपमुख्याध्यापिका सौ. उर्मिला मोरये मॅडम, शिक्षिका सौ. जयश्री मोरे मॅडम, शिक्षिका सौ. ब्रह्मकुमारी रेणू हेदुळकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेतील मुलांना मार्गदर्शन करताना सौ. उर्मिला मोरये मॅडम या स्वतः इतिहास शिक्षक आणि अभ्यासक असून छत्रपती श्री शिवरायांच्या विचारांतून कसा समाज घडवता येईल आणि स्वतः सोबतच समाजाचे देखील कल्याण कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले, शिक्षिका सौ. रेणू मॅडम यांनी आपल्या सुरेल गायानातून मुलांना संबोधन केले तसेच शिक्षिका सौ. जयश्री मोरे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शाहनुर शेख मॅडम, शिक्षक श्री. भिमराव कांबळे सर, शिक्षिका सौ. संगीता माने मॅडम व शाळेतील इतर शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांना तसेच शाळेसाठी, विद्यार्थ्यांकरीता ते करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा अर्पण करून आभार मानण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक मिळविलेला या शाळेचा विद्यार्थी कु. सुजल खेडेकर याचा ट्रस्ट मार्फत छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.