शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त संगोपिता दिव्यांग मुलांचे निवासी-अनिवासी केंद्र (मतिमंद, गतिमंद, ऑटिस्टिक, स्पास्टिक मुलांचे) आणि साई-सांज वृद्धाश्रम , बदलापूर, जि. ठाणे येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली. यावेळी शिवसंस्कृती ट्रस्टचे सन्माननीय हितचिंतक वकील श्री. सुरेश साटम साहेब, ठाणे व श्री. हेमंत कांबळे, बदलापूर यांचा जन्मदिन येथील विशेष मुलांसोबत तसेच वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना अल्पोपहार देण्यात आला, तसेच तेथील मुलांसाठी फिनाईल, निरमा पावडर,अंघोळीचा साबण, साखर, मॅगी, बिस्किटे ई. जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली आणि या शाळेसाठी छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा अर्पण करण्यात आली. या प्रसंगी सदर संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्र सुगवेकर, व्यवस्थापक श्री.नंदकुमार नार्वेकर, शांती मॅडम व इतर कर्मचारी उपस्थित होते. संगोपिता दिव्यांग मुलांचे निवासी-अनिवासी केंद्राचे संस्थापक श्री. रविंद्र सुगवेकरआणि सर्व कर्मचारी यांनी शिवसंस्कृती ट्रस्टचे सर्व देणगीदार व हितचिंतकांचे आभार मानले व ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.