तपशील

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ठाणे रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ठाणे रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये रेल्वे प्रवासी आणि ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, काळवा, ठाणेच्या उपअधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम, ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर श्री. केशव तावडे, उपस्टेशन प्रबंधक श्री. प्रभु निंबल, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख, साप्ता. ठाणे नवादूतचे संपादक श्री. दिनेश जोशी यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी माजी सैनिक श्री. राजू पाटील (अध्यक्ष, श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान, वज्रेश्वरी, एन.एस.जी. कमांडो, कारगिल युद्ध विजेते), श्री. शिवशंकर मिश्रा, डॉ. विवेक मिश्रा, वकील श्री. दयाशंकर मिश्रा, वकील शलाका साटम, श्री. शेषमनी मिश्रा, श्री. किसन बोन्द्रे, श्री. मुकेश भट्ट, वकील श्री. संजय मिश्रा, मोडी लिपी अभ्यासक श्री. नितीनराज चव्हाण व इतर मान्यवर हजर होते. यावेळी उपस्थितांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय रक्तपेढी ठा.म.पा., ठाणे यांचेमार्फत रक्त संकलन आणि मोफत एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. तसेच ऑस्कर हॉस्पिटल, ठाणे यांच्यामार्फत विनामुल्य ई. सी.जी., शुगर व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या उपक्रमासाठी दोन्ही हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांनी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मराठा उद्योजक लॉबीचे सदस्य श्री. मुकेश मराठे, श्री. ओमकार मोरे, श्री. प्रसाद घाटकर व इतरांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबीरासाठी उपस्थित सर्व हितचिंतकांनी शिवसंस्कृती ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.