ट्रस्ट मार्फत ३१ डिसेंबर २०२३ - १ जानेवारी २०२४ या दिवशी रायगडवारीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व शिवभक्तांसोबत नवीन वर्षाच्या पहाटे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तसेच छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचे पुजन करून त्यानंतर इतिहासा विषयी दुर्मिळ आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्यातील व्यक्ती व संस्थांना "शिवसंत", "शिवरत्न" आणि "शिवकार्य सन्मानपत्र" देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील माता-भगिनी, तरुण तसेच लहान मुले-मुली आणि वयस्कर शिवभक्तत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते. त्यानंतर पाचाड येथील "आई जिजाऊ" समाधीची मनोभावे पुजा करून महिलांचे ओटीभरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यातून आलेल्या शिवभक्तांना ट्रस्ट मार्फत अन्नदान करण्यात आले.