शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, ठाणे आणि राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तुळापूर, जि. पुणे येथील जिल्हा परिषद शाळा व धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या समाधी स्थळी तुळापूर येथे शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमचे पुजन करून मान्यवरांना छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेमधील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, पोवाडा आणि नृत्य सादर केले. यावेळी ट्रस्टचे सदस्य श्री. भावेश केदारे, अंबरनाथ, ठाणे यांचा जन्मदिन मुलांसोबत साजरा करण्यात आला व मुलांना खाऊ आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी या शाळेकरिता ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्याची टाकी, लोखंडी स्टँड व बेसिन सहीत बसवून देण्यात आली. त्यासाठी हेड्रॉईनचे संस्थापक शिवरत्न श्री. विजय कदम, नवी मुंबई आणि हॉटेल शिवराज, मावळ, पुणेचे संस्थापक श्री. अतुलशेठ वायकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वाहतुकीसाठी अनन्या ट्रॅव्हल्सचे संचालक श्री. महेंद्र राणे यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या, चित्रकला वह्या, वॉटर कलर, पेन्सिल ई. शैक्षणिक साहित्य आणि क्रिकेट बॅट, स्टंप, टेनिस बॉल, बुध्दीबळ, कॅरम, डंबेल्स, फुटबॉल ई. खेळाचे साहित्य मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये श्री. चंद्रकांत कदम, ठाणे यांनी वह्या उपलब्ध करून दिल्या व वकील शलाका साटम, ठाणे यांनी मुला-मुलींसाठी हातरुमाल, हेअर बँड, क्लीप ई. वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर या विभागामध्ये पोटाची भूक भागविण्यासाठी परराज्यातून आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड, कपडे, भांडी तसेच लहान मुलांसाठी बिस्किट, लाडू, केक आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील उपक्रमानंतर सोबत आलेल्या नविन शिवभक्तांना धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज, समाधी स्थळी, श्री क्षेत्र तुळापूर, पुणे येथे नेऊन श्री क्षेत्र किल्ले रायगड येथील छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचे पुजारी शिवसंत श्री. कृष्णाजी पाटील गुरुजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व श्री. शंभूमहाराज यांचे बलिदान आणि इतिहासाबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी छत्रपती श्री. संभाजीमहाराज यांच्या तुळापूर व वढू येथील समाधींसाठी चंदन व इतर पूजनाचे साहित्य ट्रस्टमार्फत अर्पण करण्यात आले. तसेच समाधीस्थळी बाहेर गावाहून आलेल्या शिवभक्तांना शिवसंत श्री. कृष्णाजी पाटील गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करून शंभूमहाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी तुळापूर गावच्या सरपंच सौ. गुम्फा इंगळे, उपसरपंच श्री. राजाराम शिवाजी शिवले, सौ. मनीषा चव्हाण अध्यक्ष, शाळा व्यव. समिती, जि. प. प्रा. शाळा, नागरमलवाडी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विमल दशरथ शेळके, उपशिक्षीका श्रीम. छाया नंदाराम वाघुले व इतर कर्मचारी यांनी उपक्रम पार पाडण्यासाठी उत्तमरित्या नियोजन केले. तसेच या उपक्रमासाठी तुळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त श्री. सुनील राउत यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमासाठी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट, नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवसंत विजयदादा खिलारे, शिवसंत सौ. नूतनआई खिलारे, शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे, श्री. विनय गावडे, श्री. गणेश रणवरे, सौ. नीतिका रणवरे, ट्रस्टचे सदस्य श्री. अनिल पांढरे, श्री. चेतन नामे, श्री. भावेश केदारे, सौ. समृद्धी खिलारे, सौ. दिपाली गायकर, शिवरत्न श्री. विकास वाघ ई. शिवभक्त उपस्थित होते. || जय शिवराय || 🚩🚩🚩🚩🚩