तपशील

जुलै २०२४ - गुरुपौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद शाळा शीळ, कातकरीवाडी, ता.शहापुर, जिल्हा ठाणे या शाळेमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वह्या, कंपास, अंकलिपी, चित्रकला वह्या, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर, ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली.

गुरुपौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद शाळा शीळ, कातकरीवाडी, शहापूर आणि जिल्हा परिषद शाळा बर्डेपाडा, केंद्र किन्हवली, ता.शहापुर, जिल्हा ठाणे या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वह्या, कंपास, अंकलिपी, चित्रकला वह्या, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर, ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा बर्डेपाडाच्या शिक्षिका सौ. जयश्री शिर्के मॅडम व जिल्हा परिषद शाळा, शीळचे मुख्याध्यापक श्री. महेश चौधरी सर यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि शाळेसाठी तसेच शिक्षकांना शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसंस्कृती ट्रस्टचे सदस्य श्री. संतोष भाबड यांच्यावतीने या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना समोसा, वेफर्स, गोड बुंदी ई. अल्पोपहार देण्यात आला. त्यांनतर मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या-पुस्तके यांचे वाटप करण्यात आले. ही शैक्षणिक मदत उपलब्ध करण्यासाठी ट्रस्टला सहकार्य केलेले सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे शाळा प्रशासनाकडून आभार मानण्यात आले. या उपक्रमासाठी ट्रस्टचे सदस्य श्री. संतोष भाबड यांनी वाहतुकीसाठी रिक्षा उपलब्ध करून दिली. तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी शहापुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदू आवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.