शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, शिवसंत श्री. कृष्णजी निवृत्ती पाटील, छत्रपती श्री शिवराय अभियान, केखले, वारणा, कोल्हापुर (छत्रपती शिवरायांच्या समाधीचे पुजारी, श्री क्षेत्र किल्ले रायगड) आणि राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी या दिवशी रायगडवारीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व शिवभक्तांसोबत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे पालखी सोहळ्याचे आयोजन करून छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शिवसंत श्री. कृष्णजी निवृत्ती पाटील गुरुजी यांच्या मार्फत शिवभक्तांसोबत गडदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व माता-भगिनी, तरुण तसेच लहान मुले-मुली आणि ज्येष्ठ शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यानंतर पाचाड येथील आई जिजाऊ यांच्या समाधीचे मनोभावे पूजन करून महिलांचे ओटीभरण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत अन्नदान करण्यात आले.