भव्य प्रतिष्ठान, ठाणे आणि शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र नवरात्रौत्सव निमित्त, खोपट, ठाणे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबई येथील अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले. या उपक्रमासाठी भव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन भोसले, शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. किरण शिंदे, श्री. शैलेश देशमुख, शाखाप्रमुख श्री. मधुकर मोरे, ॲड. श्री. राजन पवार, ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख, श्री. राजकुमार यादव, श्री. जयप्रकाश यादव व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल-श्रीफळ व छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ठाण्याचे सन्माननीय खासदार श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांनी संस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी महात्मा गांधी ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी श्री. किरण शिंदे, ॲड. राजन पवार व इतरांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे भव्य प्रतिष्ठान व शिवसंस्कृती ट्रस्ट यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.