तपशील

एप्रिल २०२५ :- मातृछाया मुलींचे वस्तीगृह, भिवंडी, जि. ठाणे येथे संगणक संच आणि ई-साहित्य प्रकाशनाची १२०० ऑनलाईन पुस्तके मदत म्हणून देण्यात आली तसेच येथील मुलींसाठी अन्नदान करण्यात आले.

उपक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील मुलींसोबत प्रांजल व झिया या दोघींचा जन्मदिन केक कापून तसेच मुलींना जीवनावश्यक भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. यावेळी मातृछाया मुलींच्या वस्तीगृहासाठी संस्थेचे हितचिंतक मिर्झान पडानिया यांच्या सहकार्याने एक संगणक संच मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आला. सोबतच येथील मुलींसाठी ई-साहित्य प्रकाशनाचे संस्थापक श्री. सुनील सामंत सर आणि श्री. शशिकांत रणवरे यांच्या अनमोल सहकार्यामुळे ई-साहित्य प्रकाशनाची कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक, कविता इत्यादी विषयांची १२०० ऑनलाईन पुस्तके वसतिगृहातील मुलींसाठी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ट्रस्टच्या हितचिंतक सौ कल्पना भांगरे मॅडम यांच्या मार्फत मुलींसाठी अन्नदान करण्यात आले. तरी वस्तीगृहातील मुलींसाठी संगणक संच उपलब्ध करून दिल्यामुळे मुलींना संगणक प्रशिक्षण घेणे सोयीचे झाल्याबद्दल तसेच एक दिवस का होईना पण मुलींच्या चेहऱ्यावर ट्रस्टच्या हितचिंक व देणगीदार यांच्या माध्यमातून हास्य फुलविण्यात आले याबद्दल संस्थेच्या व्यवस्थापिका श्रीमती जयश्री शेलार मॅडम यांनी शिवसंस्कृती ट्रस्टचे हितचिंतक आणि सर्व देणगीदार यांचे आभार मानले. तसेच याउपक्रमांतर्गत पालकांपासून दुरावलेल्या या गरजू मुलींसाठी आजपर्यंत गरजेवेळी न मिळालेली संगणकासारखी सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबदल, ट्रस्टच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत शिवसंस्कृती ट्रस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व हितचिंक व देणगीदार यांचे ट्रस्टचे विश्वस्त अमर रणवरे आणि विनय गावडे यांनी आभार मानले.