तपशील

जुन २०२५ :- ज्येष्ठ संपादक श्री. चंद्रकांत भोईटे साहेब यांच्या वयाच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच मातृछाया मुलींचे वस्तीगृह, भिवंडी, जि. ठाणे येथील गरीब व होतकरू मुलींसाठी लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले.

दिनांक २ जून २०२५ रोजी ज्येष्ठ संपादक श्री. चंद्रकांत भोईटे साहेब यांच्या वयाच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त कोर्टनाका, ठाणे येथे रक्तदान शिबिर व अवयवदान शिबीर तसेच विनामूल्य हृदय तपासणी, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हृदय तपासणी, डोळे तपासणी, हाडांची तपासणी, रक्त शर्करा मोजणी, रक्तदाब इत्यादी तपासण्या विशेषज्ञांकडून विनामूल्य करण्यात आल्या. या तपासण्या ऑस्कर हॉस्पिटल, ठाणे यांच्या सहकार्याने करण्यात आल्या. तसेच रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शिवाजीमहाराज रुग्णालय रक्तपेढी, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. यावेळी मातृछाया मुलींचे वस्तीगृह, भिवंडी, जि. ठाणे येथील गरीब व होतकरू मुलींसाठी लॅपटॉप व वह्या, पेन-पेन्सिल, कंपास पेटी ई. शैक्षणिक साहित्य देखील पुरविण्यात आले.