या दिवशी कर्मवीर श्री. सुनील खांबे साहेब, अध्यक्ष बौद्ध समाज उन्नती मंडळ, ठाणे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच विभागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांसोबत कर्मवीर श्री. सुनील खांबे साहेबांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना अल्पोपहार देण्यात आला. तसेच विभागातील गरजू विद्यार्थ्यांना लॉंग नोटबुक, लहान वह्या, पट्टी, पेन्सिल, खोडरबर ई. शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळाचे अध्यक्ष आणि दैनिक महाराष्ट्र सम्राटचे मुख्य संपादक श्री. चंद्रकांत भोईटे साहेब, ज्येष्ठ शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक वस्ताद श्री. लक्ष्मण साबणे गुरुजी आणि वस्ताद श्री. संदिप चव्हाण, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक श्री. शशिकांत नाईक सर, वरिष्ठ लेखापरिक्षक श्री. भगवान कांबळे, सिटी समोसाचे संस्थापक श्री. चंद्रशेखर वाघदरे हे उपस्थित होते. यावेळी कर्यक्रमादरम्यान छत्रपती श्री शिवरायांनी स्वराज्याला दिलेल्या या अनमोल ठेव्याचे जतन करून, शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण यापुढे देखील निरंतरपणे पुढे सुरू रहावे याकरिता आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन श्री. चंद्रकांत भोईटे साहेब आणि कर्मवीर श्री. सुनील खांबे साहेब यांनी ट्रस्टला दिले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवसंस्कृती ट्रस्ट आणि शिवसह्याद्री मर्दानी आखाडा यांच्या प्रशिक्षणार्थींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्याक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाज उन्नती मंडळाचे सदस्य श्री. लाड गायकवाड, वकील श्री. अमित पावसकर, श्री. आतिष पावसकर आणि इतर सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. तरी छत्रपती श्री शिवरायांच्या आणि धर्मवीर श्री शंभूमहाराजांच्या स्वराज्यातील आपल्या माता-भगिनींना संकट समयी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तसेच आपली तरुण मुले-मुली व महिला-पुरुष यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्व:संरक्षणासाठी सज्ज करण्याकरिता ट्रस्टमार्फत चालू करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रक्षिशणासाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी मोबाईल क्र. ९८९२०५००१६ / ९९२०८७२४२५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त यांनी केले.