तपशील

जुलै २०२६ :- राजा हरिश्चंद्र विद्यालय, मु. खुटल (बारागाव), ता.मुरबाड, जि.ठाणे या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी संगणक संच तसेच लॉंग नोटबुक, प्रॅक्टिकल वह्या, आलेख वह्या, कंपास, पेन ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली.

शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत राजा हरिश्चंद्र विद्यालय, मु. खुटल (बारागाव), ता.मुरबाड, जि.ठाणे या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी संगणक संच उपलब्ध करून देण्यात आला तसेच लॉंग नोटबुक, प्रॅक्टिकल वह्या, आलेख वह्या, कंपास, पेन ई. शैक्षणिक साहित्यांची मदत पुरविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विलास पठारे यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि शाळेसाठी शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. सुभाष खांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षक श्री. जगदीश असवले सरांनी मनोगत व्यक्त करून येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना ज्या विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्याबाबत माहिती दिली. यावेळी शिक्षक श्री. दिपक पोकळा व श्री. योगेश पठारे हे उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या-पुस्तके यांचे वाटप करण्यात आले. सोबतच ई-साहित्य प्रकाशनाचे संस्थापक श्री. सुनील सामंत सर आणि ट्रस्टचे विश्वस्त श्री. शशिकांत रणवरे यांच्या सहकार्यतून ई-साहित्य प्रकाशनाची कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक, कविता इत्यादी विषयांची १२०० ऑनलाईन पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यावेळी शाळेसाठी एक प्रकारे ऑनलाईन लायब्ररीच उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांनी ई-साहित्य प्रकाशनाचे विशेष आभार मानले आणि विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक मदत उपलब्ध करण्यासाठी ट्रस्टला सहकार्य करणारे सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे शाळा प्रशासनाकडून आभार मानण्यात आले.